श्री नवदुर्गा जागृत मंदिर सेवा ट्रस्ट तर्फे पंढरपूरहून आलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना
जगदीशनगर येथील श्री नवदुर्गा जागृत मंदिर सेवा ट्रस्ट तर्फे श्री नवदुर्गा मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दिनांक ३ मे २०२३ रोजी करण्यात आली. ही मूर्ती पंढरपूर येथून आणण्यात आली असून प्रतिष्ठापनेचे कार्य इंगोळे कुटुंबाच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमात भजन, कीर्तन, तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. मोहीनी एकादशीपासून ते त्रयोदशी पर्यंत विविध धार्मिक उपक्रम, पूजा, आरती, हवन, अभिषेक, तसेच शोभायात्रा घेण्यात आली.
शोभायात्रेला काटोल रोड वेलकम सोसायटीपासून सुरुवात होऊन आदर्शनगर, साई मंदिर, जगदीशनगर येथे समारोप झाला. श्री माणिक महाराज यांनी मूर्तीत प्राणप्रतिष्ठा विधी पार पाडला. यावेळी मंदिर समिती अध्यक्ष अनंत कपाळे, कुशल इंगोळे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या उत्सवात सुमारे ३०० पेक्षा अधिक भक्तांनी सहभाग नोंदविला.
