
Vishnu Puja
January 7, 2023
Procession, Puja Ceremony
राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न
श्री नवदुर्गा जागृत मंदिर सेवा ट्रस्ट, जगदीशनगर यांच्या वतीने राम नवमी च्या पावन दिनी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक सजावटीचा रथ, भगवे ध्वज आणि भक्तांच्या “जय श्रीराम” घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
शोभायात्रेमध्ये महिलांचा, पुरुषांचा व लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. उत्सवाची सांगता महाआरती आणि महाप्रसादाने करण्यात आली. ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत सुयोग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.