
Special Puja
December 22, 2023
Ram Navami
राम नवमी निमित्त श्रीराम प्रभूंची भव्य शोभायात्रा
श्री नवदुर्गा जागृत मंदिर सेवा ट्रस्ट, जगदीशनगर यांच्या वतीने राम नवमीच्या पावन दिनी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. भगव्या पताका, पारंपरिक पोशाखातील महिला-पुरुष, वादन, भजन, आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या शोभायात्रेमध्ये शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवून प्रभू श्रीरामचंद्राच्या जयजयकारात नगरप्रदक्षिणा केली. उत्सवाचे आयोजन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी भक्तिभावाने पार पाडले.