
राम नवमी महोत्सव उत्साहात संपन्न
श्री नवदुर्गा जागृत मंदिर सेवा ट्रस्ट, जगदीशनगर यांच्या वतीने राम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मंदिरात सकाळपासूनच श्रीराम-विठ्ठल-रुक्मिणी यांची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.
पूजेसह राम जन्म सोहळा, हवन, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेऊन श्रीराम जन्मोत्सवाचा लाभ घेतला. यावेळी धार्मिक वातावरणात रामरायाच्या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांचा मोलाचा सहभाग होता.